महा ई सेवा केंद्र सुरू करून देण्याच्या नावाखाली महिलेला गंडवले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- अकोल्यातील एका महिलेस विश्वासात घेऊन तुला घरबसल्या महा ई सेवा केंद्र सुरू करून देतो असे सांगून तिची 89 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

या प्रकरणी संदीप शरद बुळे (रा. खराडी, जिल्हा पुणे) याचे विरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित रुपाली प्रशांत गीते (रा. धुमाळवाडी, ता. अकोले) यांना आरोपी संदीप शरद बुळे (रा. खराडी जिल्हा पुणे) याने फिर्यादीस फोन करून

तुम्हाला घरबसल्या महा ई सेवा केंद्र सुरू करून देतो असे म्हणून विश्वासात घेऊन त्यांचेकडून 89,000 रुपये फोन पे करून मागवून घेतले व फिर्यादीस बँकेचे चेक दिले व ते बाऊंस होऊन फिर्यादीची फसवणूक केली.

फिर्यादीने दिलेली रक्कम परत मागितली असता पैसे देणार नाही तुला काय करायचे ते कर असे म्हणून फोनवरून शिवीगाळ केली. याबाबत फिर्यादी रुपाली गीते यांच्या फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात आरोपी संदीप शरद बुळे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

दरम्यान अकोले पोलिसांनी आरोपीला जळगाव जिल्हा येथुन अटक केली. तसेच आरोपीने फिर्यादीची फसवणूक करून घेतलेले 89,000 रुपये फिर्यादीस देण्याचे कबुल केले व सदर रक्कम फिर्यादीस मिळवून दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe