जिल्ह्यातील या तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. यामुळे नगरकरांना काहीसा दिलासा मिळतो आहे.

यातच अनेक ठिकाणी रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यातच जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका आता हळूहळू कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू लागला आहे.

गेल्या 24 तासात श्रीरामपूर तालुक्यात केवळ 09 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर बुधवारी 149 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 33 होती. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्याची करोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 15486 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 14792 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे शासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह हे कोविड सेंटर बुधवार पासून बंद करण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe