अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत मंजूरही करण्यात
आल्यानंतर त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यानी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, एका गंभीर प्रकरणात अटक झालेल्या अधिकाऱ्याने पत्र लिहून वाटेल तसे बेछूट आरोप करायचे हे चुकीचे आहे.
गंभीर प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यावर भाजप अशाप्रकारचा ठराव घेत असेल तर यात भाजपची वैचारिक दिवाळखोरीच समोर आल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली गाडी ठेवणे आणि इतर प्रकरणाचा तपास केंद्र सरकारची एनआयए ही यंत्रणा करत आहे.
महाराष्ट्राची जनता दूधखुळी नाही. ही पत्रे दबावाखाली लिहून घेतली आहेत अशी आमची खात्री आहे. त्यामूळे त्या पत्रात जे उल्लेख केले आहेत ते खोटे आहेत.
काहीच हातात सापडत नसल्याने संशयाचे भूत निर्माण करण्यासाठी भाजप खालच्या पातळीवर उतरला आहे.
त्यामुळेच त्यांनी अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी असा ठराव भाजप कार्यकारिणीत ठेवण्यात आल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम