अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- आजपर्यंत आपण आंदोलनाचे अनेक प्रकार पाहिले आहेत. तसेच आतापर्यंत कोणतेही आंदोलन ठराविक कालावधीनंतर समाप्त केले जाते किंवा माघार घेतली जाते.
परंतु सध्या देशात असे एक आंदोलन सुरू आहे की ते मागील सात महिन्यांपासून सुरू झालेले आहे. ते अद्यापही सुरूच आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी हे कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन सुरू केलेले आहे.
ते तब्बल सात महिन्यांपूर्वी व ते आजतागायत सुरूच आहे. बहुधा सर्वाधिक काळ चालणारे आंदोलन म्हणून याकडे पाहिले जाईल. मात्र या शेतकरी आंदोलनाची दखल घेतली जात नाही.
दिल्लीच्या सीमांवर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला दि.२६ जूनला सात महिने पूर्ण होणार आहेत. त्यादिवशी शेती बचाव, लोकशाही बचाव दिन पाळला जाणार आहे.
कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी मागील वर्षीच्या दि.२६ नोव्हेंबरपासून दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून आहेत.
त्या आंदोलनाचे नेतृत्व संयुक्त किसान मोर्चा करत आहे. आता आंदोलनाला सात महिने पूर्ण होत असल्याच्या दिवशी शेतकरी संघटनांकडून देशभरात निदर्शने केले जाणार आहेत.
त्याशिवाय, दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनस्थळी पोहचण्यासाठी राजस्थान आणि उत्तरप्रदेशातील आणखी शेतकऱ्यांनी गुरूवारी कूच केले.
आंदोलनाचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचे नेतृत्व करणारा भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांवर सामाजिक बहिष्कार टाकला आहे.
त्यातून भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांना आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आल्याच्या घटना विविध ठिकाणी घडल्या.
कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी आंदोलक ठाम आहेत. तर, ते कायदे मागे घेण्यास मोदी सरकारने स्पष्ट नकार दर्शवला आहे. त्यामुळे अनेक महिने होऊनही शेतकरी आंदोलनाची कोंडी कायम आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम