जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व जय हिंद वृक्ष बँकच्या वतीने

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व जय हिंद वृक्ष बँकच्या वतीने बहिरवाडी (ता. नगर) येथील डोंगरावर वड, पिंपळ, लिंब, उंबर व बेलचा समावेश असलेल्या 625 पंचवृक्षांची लागवड करण्यात आली.

डोंगर रांगावर राबविण्यात आलेल्या या वृक्ष लागवडची सुरुवात पद्मश्री पोपट पवार, आर्दश पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले व ह.भ.प. लक्ष्मण महाराज कराड यांच्या हस्ते वृक्षरोपणाने करण्यात आली.

बहिरवाडीच्या डोंगर माथ्यावर भैरवनाथ मंदिर परिसरात पंचवृक्षात समावेश असलेल्या वड, पिंपळ, लिंब, उंबर व बेलचे प्रत्येकी 125 झाडे महादेवाच्या पिंडीच्या आकारात लावण्यात आली. यावेळी ह.भ.प. ढवळे ताई,

पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, सरपंच अंजली येवले, रामनाथ शिरसाठ, राजू दारकुंडे, सरपंच शिवाजी पालवे, कारभारी गर्जे, सरपंच अण्णासाहेब मगर, अशोक आव्हाड, कैलास पठारे, दत्तात्रय जरे, शंकर बळे, गोविंद जरे, रितेश पवार,

बंडू पवार, वैभव खलाटे, वनश्री खामकर, जय हिंदचे शिवाजी पालवे, भाऊसाहेब करपे, निवृती भाबड, शिवाजी गर्जे, संतोष मगर, संभाजी वांढेकर, संचालक अमोल धाडगे, शैलेंद्र आडसुरे, अमोल ढेपे, एकनाथ माने, भरत खाकाळ, सचिन दहिफळे,

अ‍ॅड. संदिप जावळे, पोपट पालवे, आबासाहेब साळवे, कुशल घुले, संजय मुठे, अनिल ससे, अ‍ॅड. अविनाश बुधवंत, देविदास येवले, गोरक्षनाथ काळे, प्रकाश कोटकर, स्वराज्य सैनिक परिवार संगमनेर विकास जगदाळे, बाबा दारकुंडे, संजय येवले,

बाबाजी पालवे, बाबा खर्से, राजेंद्र ससे, धर्मराज ठाणगे, अशोक मुठे आदिंसह आजी-माजी सैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते. प्रास्ताविकात शिवाजी पालवे यांनी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिक पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देत आहेत.

संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील डोंगररांगा हिरवाईने फुलविण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. वृक्ष बँकेची निर्मिती करुन मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पद्मश्री पोपट पवार म्हणाले की, माजी सैनिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी उचललेले पाऊल उद्याच्या उज्वल भविष्याची नांदी आहे. माजी सैनिकांनी देश रक्षणाचे कर्तव्य बजावून समाजाप्रती दाखवलेली आस्था प्रेरणादायी आहे.

आज निर्सगाचा विचार न केल्यास भविष्यात येणार्‍या संकटात मनुष्याचा देखील विचार होणार नाही. स्वत:च्या असतित्वासाठी मनुष्याने पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावण्याचे त्यांनी सांगितले.

भास्करराव पेरे यांनी माजी सैनिकांनी पंचवृक्ष संकल्पना राबवून डोंगररांगा हिरवाईने फुलविण्यासाठी घेतलेला उपक्रम आदर्शवादी असल्याचे स्पष्ट केले. शिवाजी कर्डिले यांनी आजी-माजी सैनिक समाजाचे भूषण असून,

नगर जिल्ह्यात माजी सैनिकांनी मोठी सामाजिक चळवळ उभी केली असल्याचे सांगितले. ह.भ.प. लक्ष्मण महाराज कराड यांनी सर्व धर्मात निसर्गाला महत्त्व देण्यात आले आहे. मात्र स्वत:च्या लोभापायी मनुष्य निसर्गाची परतफेड करण्यास विसरल्याने

पर्यावरणाचे प्रश्‍न गंभीर बनले आहे. वेळीच जागृक होऊन वृक्षरोपणाने पर्यावरणाचे समतोल साधण्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब करपे यांनी केले. आभार शिवाजी गर्जे यांनी मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!