अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- राहुरी तालूक्यातील खडांबे येथील साळवे कुटूंबावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार करण्यात आला.
त्या साळवे कुटूंबाला न्याय न मिळाल्यास तसेच आरोपीला पाठीशी घालणारे राहुरी येथील पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांचे निलंबन झाले नाहीतर येत्या अधिवशनात काळे झेंडे दाखवण्यात येईल.
असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे यांनी आज दिनांक २५ जून रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलिस ठाण्यावर काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी दिला. राहुरी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे.
न्याय व्यवस्था दलित व अदिवासी समाजाला न्याय देण्यात कमी पडत आहे. तालूक्यातील खडांबे येथे अत्याचार करणाऱ्या आरोपींना पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पाठीशी घालण्याचे काम केले.
येत्या आठ दिवसांत पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना निलंबित केले नाहीतर अहमदनगर येथील पोलिस मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा तालूकाध्यक्ष अनिल जाधव यांनी दिला.
या प्रसंगी डाॅ. जालिंदर घिगे यांनी सांगितले कि, कायद्याचे पालन करणारेच कायदा मानत नसेल तर अंदोलन करणे गरजेचे आहे. गुन्हेगारांना पाठिशा घालणाऱ्या अधिकाऱ्यास तातडीने निलंबित करावे.
तालुक्यातील खंडाबे व कुरणवाडी येथील दोन्ही घटना अत्यंत गंभिर आहेत. छत्रपतीच्या राज्यात शिवाजी महाराजांनी कधीही जातीभेद केला नाही. ते अन्यायाच्या विरोधात लढत राहिले. आम्ही त्यांच्याच मार्गावर चालत आहोत.
यावेळी बोलताना ॲड. भाऊसाहेब पवार म्हणाले कि, राहुरी पंचायत समितिचा सदस्य बाळासाहेब लटके यासह त्याच्या कुटूंबियाने साळवे कुटूंबियांना मारहाण करुन जातिवाचक शिविगाळ केली होती.
मात्र राहुरीचे पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांनी साळवे कुटूंबाची खरी तक्रार न घेता चुकीची फिर्याद घेतली. त्याचवेळी ॲट्रोसिटी का दाखल केली नाही. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सदर प्रकरणाची दखल घेऊन मोर्चा काढण्याचे निवेदन दिले.
तेव्हा तब्बल पंधरा दिवसाने राहुरी पोलिसात गुन्हा दाखल झाल. निवेदन देताच का लगेच आरोपींना अटक केली? याचा अर्थ काय? की पोलिस या आरोपींना पाठिशी घालत होते? यावेळी बौध्द महासभेचे गौतम पगारे,
बाबुराव मकासरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून राहुरी पोलिस ठाण्याच्या कारभारा बाबत नाराजगी व्यक्त केली. या आंदोलनात पिंटूनाना साळवे, सलिम शेख, बाळासाहेब बर्डे, ईश्वर खिलारी, सुनिल ब्राम्हणे, रविंद्र गायकवाड,
गोरख थोरात, खडांबे येथिल पिडीत कुटूंबातील महिला, मुलगा व मुलगी यासह अनेक कार्यकर्ते अंदोलनात सामिल झाले होते. यावेळी निवेदन स्विकरतांना पोलिस उपधिक्षक राहुल मदने यांनी अंदोलनकांना सांगितले की, तुम्हाला पुन्हा अंदोलन करण्याची गरज पडणार नाही.
यावेळी अंदोलकांनी प्रश्न केला की पोलिस निरिक्षक दुधाळ यांना निलंबित कधी करणार? तेव्हा संबधित घटने बाबत चौकशी करून जिल्हा पोलिस अधिक्षकाकडे सर्व अहवाल पाठवण्यात येईल व न्याय दिला जाईल. असे मदने यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम