अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या एकास कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एक महिला तिच्या मुलासोबत श्रीगोंदा येथून भांबोरा येथे मोटरसायकलवरून जात होती.
कर्जत तालुक्यातील जलालपूर गावाच्या शिवारात सटवाई वस्तीजवळ रस्त्यात पाऊस लागल्याने ते एका बाभळीच्या झाडाखाली आडोशाला थांबले होते.
त्या ठिकाणी मोटरसायकलवर अज्ञात २० ते २५ वर्षाचे दोन इसम आले व चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील ३०००० रुपये किमतीचे साडेसात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून घेऊन निघून गेले.
याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती समजली कि, हा गुन्हा राजु रमेश चव्हाण याने केला आहे.
त्यानुसार पोलिसांनी जलालपूर शिवारातून राजू रमेश चव्हाण (वय २१ वर्ष, रा. जलालपूर, ता. कर्जत) यास पकडले असुन त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
या आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार मारुती काळे हे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम