अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावरुन केलेल्या टीकेला उत्तर दिले.
“छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहे, मात्र मला दुःखानं सांगावं लागत की या वयात त्यांना खोटं बोलावं लागतं.
2018 ला जेव्हा ही केस सुरू झाली तेव्हा ते जेलमध्ये होते. या संपूर्ण केसची जबाबदारी फडणवीस यांनी मला दिली होती.
मी रात्र रात्र बसून या अध्यादेशावर काम केलं आणि अध्यादेश तयार केला. त्यामुळे त्यांच्या या बोलण्यावर किंव येते की असं त्यांना का बोलावं लागलं,” असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा आम्ही भुजबळ, वडेट्टीवार, नाना पटोले यांना भेटलो. त्यांना अध्यादेश लॅप्स होत आहे असं सांगितलं. त्यांनी तो कन्टिन्यू केला नाही.
हे त्यांच्या अंगावर येत आहे. म्हणून ते आता असं बोलत फिरत आहेत. त्यांनी या वयात तरी खोटं बोलू नये.
ते खोटं बोलत आहे आणि रेटून खोटं बोलत आहेत. ओबीसी आंदोलनात राजकारण आम्हाला करायचं नाही. चिंतन बैठक आहे असं सांगितलं, मात्र आता ती राजकीय बैठक ठरत आहे. मात्र मी त्यात जाणार आहे.”
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम