आई ती आईच…मांजराच्या पिल्लाला कुशीत घेऊन कुत्रीनं पाजलं दूध

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- कुत्रा आणि मांजरीतील भांडण संपूर्ण जगाला परिचयाचे आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या इमारतीत, परिसरात किंवा कॉलनीत कुत्रा आणि मांजरीची भांडणं अनेकदा पाहिली असतील.

पण याही पलिकडे कुत्रा मांजरीचं नातं असतं, यावर तुम्हाला विश्वास ठेवायला भाग पाडेल असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. कारण या व्हिडीओमध्ये एक मांजर एका मादी कुत्र्याचे दूध पित आहे आणि कुत्रीलाही याबाबत कोणताही त्रास नसून ती शांतपणे पडून आहे.

जणूकाही ती स्वतःच्या पिल्लांना दूध पाजत आहे. कर्जतपासून जवळच असलेल्या कर्जत शिंदेवाडी रोडलगत छोट्या राऊत यांचे हॉटेल आहे.

येथे कुत्री, तिची पिल्ले आणि मांजर कुटुंबातील सदस्य बनले आहेत. छोट्या राऊत यांचे कर्जत शिंदेवाडी रोड लगत छोटे हॉटेल आहे.

तेथे कुत्री आणि मांजर दोघे एकाचवेळी प्रसूत झाले. मांजरीला सहा पिल्ले झाली तर कुत्रीला पाच पिल्ले झाली. मात्र दुर्दैवाने मांजर आणि तिची पाच पिल्ले मरण पावली.

मांजराचे एक पिल्लू जिवंत राहिले. या लहान पिल्लाला जगवायचे कसे ? असा प्रश्न छोट्या राऊत यांना पडला होता. कारण ते पिल्लू काही खात नव्हते.

मग एक दिवस कुत्रीच्या पिल्लासोबत मांजराच्या पिल्लाला कुत्रीला पाजले. मग हे नित्याचेच झाले.

छोट्या राऊत यांनी कुत्रीची पिल्ले विकली. तेव्हापासून तर ही कुत्री व मांजराचे पिल्लू एकत्रच रहात आहेत.

मांजरीच्या पिल्लाचा कुत्रीने सांभाळ केला. त्याच्याकडे आपल्या लेकराप्रमाणे लक्ष ठेवते. हे अनोखे दृश्य पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे मातृत्व पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe