राज्यमंत्री तनपुरे म्हणाले… त्यांच्यावर गुन्हे दाखल करा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-पाथर्डी तालुक्यातील मिरी प्रादेशिक योजने अंतर्गत ३३ गावे येत असून मुळा धरणातून यासाठी पाणीपुरवठा होतो.

प्रादेशिक नळ योजनेच्या लाभाविषयी गेल्या दहा वर्षांपासून गावोगावच्या लोकांच्या तक्रारी वाढत असून बेकायदा नळजोड, पाईपलाईन फोडून पाणी घेणे, मीटरची नासधूस, थकीत वीज बिल आदी मुद्यांवरून योजना चर्चेत आहे.

आता याच मुद्यावरून नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मुख्य जलवाहिनीवरून बेकायदा नळजोड घेतलेल्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा, असे आदेश तनपुरे यांनी दिले.

प्रत्येक आठवड्याला योजनेविषयीचा अहवाल पंचायत समिती प्रशासनाने सादर करावा. बेकायदा नळजोड असतील तर काढून घ्या.

तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो. अगदी आमच्या पक्षाचा कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करा. यावेळी बोलताना तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना देखील चांगलेच झापले, ते म्हणाले, निश्चित आकडेवारी सांगता येत नाही.

वीज पंपाची सद्यस्थिती माहीत नाही. पाण्याचे मीटर, विजेचे मीटर अद्ययावत नाही. लिकेज कोठे, बेकायदा नळजोड कोठे, जलवाहिनी कोठे फोडली याची माहिती नाही. यंत्रणा काय करते, अशा शब्दात तनपुरे यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe