वृत्तसंस्था :- अलीकडे मोबाईल पेमेंट सर्विस वापरणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे,तुम्ही जर Paytm वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
Paytm बद्दलचे घोटाळे एकेक समोर येतायत. त्यामुळे Paytm ने एक सूचना त्यांच्या युजर्सना केली आहे.ग्राहकांना आवाहन करण्यात आलं आहे,
Paytm च्या KYC शी संबंधित असलेल्या प्रत्येक कॉल आणि SMS पासून सावध राहावे. जर एखादा फोन किव्हा SMS द्वारे एखादी लिंक डाउनलोड करायला सांगितले असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका.
असा होतो Paytm फ्रॉड
Paytm घोटाळ्यामध्ये फसवणूक करणारे लोक कस्टमर्सना फोन करून सांगतात, तुमची KYC ची मुदत संपली आहे आणि Paytm ने तुमचा KYC अॅक्टिव्हेट करण्यासाठी कॉल करत आहोत. त्यानंतर ते AnyDesk, TeamViewer ही अॅप इन्स्टॉल करून घेतात.
नंतर तुमच्याकडून App ची परवानगी मागतात. एकदा ही परवानगी दिली की तुमच्या फोनचा रिमोट अॅक्सेस त्यांना मिळतो. त्यामुळे बँकेच्या खात्याबदद्लची सगळी माहिती त्यांच्याकडे जाते.
हे घोटाळेबाज कॅशबॅकचं आमिष दाखवूनही त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायला लावतात. त्यामुळेच हे SMS कायमचे डिलिट करून टाका.या मेसेजमध्ये तुमचे डिटेल्स घेतले जातात आणि फसवणूक सुरु होते.