अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात जुलै महिन्यात पुन्हा एकदा पाऊस दमदार हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ३० जून पर्यंत प्रामुख्याने कोकण विभागात मध्यम सरींची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात जून अखेपर्यंत तुरळक ठिकाणीच हलक्या पावसाची शक्यता आहे.
हवेच्या चक्रीय स्थितीमुळे झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश या भागांमध्ये तसेच विदर्भाच्या काही भागांमध्ये २६ ते ३० जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.
काही ठिकाणी विजांच्या कडकडाटाचीही शक्यता आहे. सध्या मान्सूनने १९ जूनपर्यंत देशाचा ९० टक्के भाग व्यापून टाकला. पण पुढे पोषक वातावरण मिळाले नाही. यामुळे मान्सूनचा प्रवास मंदावला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम