अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- पदभारलघुशंकेसाठी घराबाहेर पडलेल्या विवाहितेचा परिसरातील एका विहिरीत मृतदेह आढळला आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी शिवारात घडली आहे.
कविता सागर साळुंखे असे या मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, लघुशंकेसाठी जाते असे सांगून ती शनिवारी रात्री घराबाहेर पडली होती.
मात्र ती पुन्हा घरी आली नाही. बराच वेळ झाला तरी ती परत आली नाही त्यामुळे तिचा शोध घेतला असता सकाळी तिचा मृतदेह शिवाजी कसबे यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला.
याबाबत शिवदास साळुंखे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे .
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम