अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष अपवाद वगळता कायम सत्तेत राहिले. परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने कधी घेतला नाही.
आज शिवसेना त्यांच्यासोबत सत्तेत आहे. मात्र शिवसेना मराठा आरक्षणा बद्दल एकही शब्द बोलायला तयार नाही.
शिवसेना फक्त सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करते, परंतु मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस भूमिका शिवसेनेने घेतली नाही.
५ जुलैपासून दोन दिवसीय अधिवेशनात सर्वांनी याबाबत आवाज उठवावा,अन्यथा समाजाचा तुमच्यावरील विश्वास उडेल, असे आवाहन शिवसंग्राम पक्षाचे तालुकाध्यक्ष परमेश्वर टकले यांनी केले आहे.
निवेदनात टकले यांनी म्हटले आहे की, आजपर्यंत सर्व पक्षांनी मराठा समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. आता होणाऱ्या अधिवेशनामध्ये सर्वपक्षीय मराठा आमदारांनी राजकीय भेद विसरून मराठा समाजाला न्याय द्यावा.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम