पुन्हा एकदा मान्सून दमदार हजेरी लावेल !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :-  राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर दमदार पावसाला सुरुवात झाली होती. पण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या.

यानंतर आता जुलै महिन्यात पुन्हा एकदा मान्सून दमदार हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. तत्पूर्वी रविवारी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

राज्यात बहुतांशी ठिकाणी सकाळापासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पुढील दोन ते तीन तासांत महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

दक्षिण कोकण आणि घाट परिसरातही जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यात शांत झालेल्या मान्सूनने कमबॅक करण्याचे संकेत दिले आहेत.

पण पुढील आणखी एक आठवडा राज्यात अशीच स्थिती असण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

रविवारी विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात तुरळक पाऊस झाला. याचबरोबर, सोमवारी विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांमुळे 30 जून पर्यंत कोकणातील काही भागात मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जून अखेपर्यंत तुरळक ठिकाणीच हलक्या पावसाची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News