अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- जून महिना संपला आहे मात्र अद्यापही अनेक भागात पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यातच कोरोनामुळे अनेक दैनंदिन कामांवर मर्यादा आल्या आहेत.
अशातच अनेक उपवर मुले व मुलींचे विवाह लांबणीवर पडत चालले आहेत. त्यामुळे अनेकजण मुलगी पाहण्यासाठी येतात व मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह उरकून घेतात.
शेवगाव तालुक्यात काल असेच काही पाहुणे मंडळी मुलगी पाहण्यासाठी आले होते. मात्र या भागात झालेल्या जोरदार पावसाने एका ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात या पाहुण्यांची चक्क कारच वाहून गेल्याची घटना घडली आहे.
शेवगाव तालुक्यातील एका गावात मुलीला पाहण्यासाठी पाहुणे कारने आले होते. मात्र तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने आलेल्या पुरात त्यांची कार वाहून गेली आहे.
ती कार धावणवाडीच्या गावालगत असलेल्या पुलाला अडकली तब्बल ही कार १६ तासानंतर सोमवारी सकाळी ग्रामस्थांच्या मदतीने पाण्याबाहेर काढण्यात आली.
तालुक्यात काल गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर झालेल्या जोरदार पावसामुळे जवळपासची तलाव,बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. त्यामुळे काल अनेक भागातील छोटे ओढे,नाले ओसंडून वाहत होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम