नेवासा तालुक्यातून बावीस वर्षीय तरूणी बेपत्ता!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- मागील वर्षापासून कोरोनाने हाहाकार माजवला असून आता कुठे कोरोनाचा ज्वर कमी होत नाही तोच परत गुन्हेगारी टोळ्यांनी आपले डोके वर काढले आहेत.

कुठे ना कुठे रोज दरोडे, खून यासारख्या गंभीर घटना घडत आहेत. नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथील एक २२ वर्षीय तरूणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.

सुमिधा सुरेश जाधव असे या बेपत्ता झालेल्या तरूणीचे नाव असून ती बेपत्ता झाली असल्याची फिर्याद सोनई पोलिसांत दिली आहे.

अधिक माहितीनुसार सुमिधा सुरेश जाधव (वय २२, रा. शिरेगाव बेटवस्ती, ता.नेवासा) ही तरूणी रविवार दि.२७ रोजी दुपारी दीड वाजल्यापासून राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे.

ती अद्याप आली नसल्यामुळे तिचे चुलते शिवाजी किसन जाधव यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

ती कोणास आढळून आल्यास सोनई पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News