अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत २२ कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणातील फसवणूक व अपहार प्रकरणी पोलिसांनी राहूरी येथील डॉ.भागवत सिनारे, श्रीरामपुरचे डॉ.रवींद्र कवडे तसेच डॉ.विनोद श्रीखंडे या तिघांना अटक केली असून
न्यायालयाने ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे., नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अनेक घोटाळे उजेडात आले आहेत.त्यापैकीच पिंपरी चिंचवड शाखेतील एक घोटा उजेडात आला होता.
बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेत 22 कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तपासामध्ये झाले होते. चिंचवड पोलिसांनी प्रमुख व्यवस्थापक महादेव साळवे यांच्या फिर्यादीवरून 25 जानेवारीला कर्जदार बबन चव्हाण, वंदना चव्हाण,
यज्ञश चव्हाण, मंजुदेवी हरिमोहन प्रसाद, रामचंद्र तांबीले(सर्व.रा.चिंचवड), अभिजित नाथा घुले(रा.बुरुडगाव रोड, नगर) यांच्यासह बँकेच्या कर्ज उपसमितीमधील सदस्य व नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे.
पुण्यातील आर्थिक गुन्हे अन्वेशन विभागाने या संदर्भात 8 जणांना अटक केलेली आहे.या प्रकरणात काहिंना अटकपूर्व जामीन मिळालेले आहेत तर काहींना जामीन मंजूर झालेला आहे. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर नगर येथील आशुतोष लांडगे
याच्या नावावर कर्जाच्या रकमेतून 11 कोटी रुपये वर्ग झाल्याचे समोर आले आहे लांडगे याला अटक केल्यानंतर त्याने अनेक विषयांचा उलगडा केला होता. त्या दृष्टीकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला होता.
हे 11 कोटी रुपये कुणाला दिले व त्याचा वापर कशा पद्धतीने करण्यात आला होता, याचा तपास करताना यात नगर जिल्ह्यातील राहूरीतील डॉ.भागवत सिनारे, श्रीरामपुरचे डॉ.रवींद्र कवडे, नगरचे डॉ.विनोद श्रीखंडे या तिघांचा समावेश असल्याचे उघड झाले.
या डॉक्टरांकडे सव्वा सहा कोटी रुपये वर्ग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नगरला येऊन तीनही डॉक्टरांना ताब्यात घेऊन अटक केली.
पुणे येथे न्यायालयात हजर करण्यात आले असता 22 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात तिघांचा समावेश असल्याचे उघड झाले असून त्यांच्या खात्याची तसेच बँकेचे स्टेटमेंट घेऊन या घटनेचा तपास करायचा आहे.
या तीनही डॉक्टरांच्या खात्यात पैसे कुणी आणि कसे टाकले, त्यांनी या पैशाचे काय केले, याचा तपास पोलीसांना करायचा आहे.त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकार पक्षातर्फे करण्यात आली.
न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून तिन्ही डॉक्टरांना बुधवार ३० जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम