श्रीरामपूर तालुक्यातील ‘त्या’ कंपनीकडे तब्बल 85 कोटींची थकबाकी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- कोरोनाकाळात अर्थचक्राला गती मिळावी यासाठी शासन प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे काही उद्योजकांकडून तसेच काही कंपन्यांकडून कोट्यवधींच्या रकमा थकीत ठेवण्यात येऊ लागल्या आहेत.

असाच काहीसा कोट्यवधींचा थकबाकीचा प्रकार श्रीरामपूर तालुक्यात घडला आहे. तालुक्यातील हरेगाव येथील बेलापूर इंडस्ट्रीज लि.,कंपनीकडे एकूण 85 कोटी 03 लाख 11 हजार 800 रुपये थकबाकी आहे.

सदर रक्कम कंपनीचे पदाधिकारी यांचेकडून वसुलीची कार्यवाही सुरू करावी, सदर रक्कम पदाधिकारी भरत नसल्यास त्यांच्या व्यक्तिगत मालमत्तेतून व त्यांचे बँक खाते सील करून त्वरित वसूल करण्यात यावी अशी मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि, हरेगाव येथील बेलापूर इंडस्ट्रीज लि. या कंपनीस 682 एकर जमीन भाडेपट्ट्याने 99 वर्षांच्या कराराने देण्यात आली होती.

त्या भाडेपट्ट्यापोटी कंपनीकडून एकूण 85 कोटी 03 लाख 11 हजार 800 रुपये थकीत रक्कम शासनाला देणे बाकी आहे. सदर रक्कम ही 2018 पर्यंतचीच असून तेव्हापासून ते शासनाने सदर जमीन ताब्यात घेईपर्यंतचा भाडेपट्टा आकारणे गरजेचे आहे.

कारण सदरहू बेलापूर इंडस्ट्रीज लि. यांनी आजतागायत सदर जमिनीचा ताबा सोडलेला नाही.

त्यामुळे 2018 सालापासूनही भाडेपट्ट्याची रक्कम आकारणे गरजेचे आहे. अशी मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe