सरकारी जमिनीतून तब्बल 150 ब्रास मुरुमाची चोरी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- देवस्थान इनामी असलेल्या सरकारी मालकीच्या जमिनीतून सुमारे 150 ब्रासहून अधिक मुरूमाचे बेकायदा उत्खनन करून चोरून नेण्यात आल्याची घटना घडली आहे.

दरम्यान हा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती शिवारातील नदीकाठच्या परिसरात घडला आहे.

याबाबत ग्रामस्थांनी नेवाशाच्या तहसीलदारांकडे केली आहे. ग्रामस्थांकडून तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, जेऊर हैबतीत म्हस्के, घुगरे वस्ती लगतच रामबाबा देवस्थानच्या भोवतलाच्या नदीकाठाजवळचा मुरूम जेसीबी व ट्रॅक्टरट्रॉल्यांतून नेण्यात आला आहे.

त्यासाठी सरकारी जमिनीत सहा ते सात फुटांपर्यंत खड्डे करण्यात आले आहेत. ग्रामस्थांकडेे मुरूमाची चोरी करणारे जेसीबी यंत्र व ट्रॉल्यांचीही नावानिशी छायाचित्रे पुराव्यानिशी उपलब्ध आहेत.

सरकरी जागेवरील मुरूमाचे बेकायदा उत्खनन व वाहतूक सुरू असताना काही ग्रामस्थांनी गावच्या तलाठी व ग्रामसेवकास या चोरीची माहिती दिली.

मात्र तलाठी व ग्रामसेवकाने याकडे गांभिर्याने न बघता दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना या मुरूम चोरी प्रकरणी स्थानिक सरकारी यंत्रणेबद्दलच संशय बळावला आहे

. सरकारी मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावण्यात येऊन चोरलेला मुरूम जेऊर हैबती शिवारातच वापरण्यात आला आहे.

महसूल यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रत्यक्षात पाहणी करून पंचनामा करावा व संबंधितांसह स्थानिक सरकारी यंत्रणेवरही कारवाई करावी. तसेच जेसीबी यंत्रचालक व मालकास ताब्यात घेतल्यास या मुरूम चोरीचा प्रकार उघडकीस येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe