लोणी – लग्न करतो असे म्हणून लोणी ता . राहाता येथे घरी बोलावून बेडरुममध्ये नेवून ३४ वर्षाच्या तरुण महिलेवर बलात्कार करण्याचा खळबळजनक प्रकार २२ जुलै २०१९ रोजी ११ च्या सुमारास घडला . पिडीत महिला सोलापूर परिसरातील आहे.
या प्रकरणी काल पिडीत महिलेने लोणी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी कैलास ज्ञानेश्वर विखे , रा . लोणी , ता . राहाता याच्याविरुद्ध भादवि कलम ३७६ , ३२३ , ५०४ , ५०६ , ५०७ प्रमाणे गुरनं . ३४० दाखल करण्यात आला असून पिडीत महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की , तिने भारत मेट्रोमोनी या वेबसाईटद्वारे संग्राम पाटील नाशिक या व्यक्तीशी १५ / ७ / २०१९ रोजी ओळख झाली.
तेव्हा त्याने त्याची पत्नी मयत झाल्याचे सांगून त्याचे खरे नाव कैलास ज्ञानेश्वर विखे , रा . लोणी , ता . राहाता असल्याचे सांगितले. त्यावर महिलेने लोणी येथे कुटुंबासह जावून लग्नाची बोलणी पक्की केली.
दि . २२ रोजी त्र्यंबकेश्वर येथे जावून पूजा केली. आरोपी कैलास ज्ञानेश्वर विखे याने महिलेला तू माझ्याबरोबर लोणी येथे चल आपण लग्न करू , असे म्हणून २२ / ७ / २०१९ रोजी ११ च्या सुमारास लोणी येथे आणून त्याच्या बेडरुममध्ये नेले व महिलेच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध करून बलात्कार केला.
महिला तिच्या गावी गेली . तिला आरोपी कैलास विखे याने शिवीगाळ करुन अपशब्द बोलून मोबाईल फोनद्वारे व्हिडीओ कॉलवर बोलून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी सोलापूर येथे गुन्हा दाखल होवून ऑनलाईन पद्धतीने लोणी पोलिसांत दाखल झाला असून घटनास्थळी सपोनि प्रकाश पाटील यांनी भेट दिली. पुढील तपास ते स्वतः करीत आहेत .