अहमदनगर ब्रेकिंग : त्या पती पत्नीच्या हत्येचे रहस्य उलगडले ! या कारणामुळे झाली हत्या….

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील चांगले वस्तीमध्ये पती-पत्नीच्या डोक्यात फावड्याने वार करुन निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून

त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

कोर्‍हाळे येथील शशिकांत श्रीधर चांगले (वय 60) व सिंधुबाई शशिकांत चांगले (वय 55) या दोघा पती-पत्नीच्या डोक्यात फावडे मारुन त्यांची हत्या झाली होती.

याप्रकरणी राहाता पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत असताना पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच

त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली हत्येचा उद्देश प्रथमदर्शनी मारहाण करणे व ऐवज लुटणे हाच असल्याचे दिसत आहे

यातील आरोपी दूधकाल्या उर्फ भारत भोसले, दिलीप विकास भोसले, आवेल भोसले,मायकल चव्हाण आणि डोंगर्या चव्हाण हे (सर्व राहणार कोपरगाव) यांना ताब्यात घेतले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe