रेखा जरे हत्याकांड : म्हणे हत्याकांडाशी काहीही संबंध नाही ! पण अखेर न्यायालय….

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याप्रकरणातील आरोपी ऋषीकेश उर्फ टम्या पवार (प्रवरानगर) याचा जामिन अर्ज जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी फेटाळला आहे.

जामीन अर्जावर आज सुनावणी :- सहा आरोपींपैकी न्यायालयीन कोठडीत असलेल्या टम्या पवारने जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.

पवारच्या जामीन अर्जाला विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील व फिर्यादी जरे यांचे वकील सचिन पटेकर यांनी कडाडून विरोध केला.

१७ वेळा मोबाईलवरून संपर्क :- सरकारी पक्ष व फिर्यादीची बाजू मांडताना सरकारी वकील पाटील व फिर्यादीचे वकील पटेकर यांनी,

आरोपी टम्या पवारने हत्याप्रकरणातील बोठेसह इतर आरोपींशी २४ नोव्हेंबर रोजी किमान १७ वेळा मोबाईलवरून संपर्क साधला आहे.

करंजी घाटात रेखा जरे यांची हत्या करण्याचा प्रयत्न :- पोलीस तपासात ही बाब निष्पन्न झाली आहे.२४ नोव्हेंबर रोजी करंजी घाटात अपघात घडवून रेखा जरे यांची हत्या करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता मात्र तो फसला.

आरोपींबरोबर टम्या पवार सहभागी होता ! करंजी घाटात रेखा जरे यांची हत्या करण्याचा प्रयत्न फसल्याने त्यांच्या हत्येचा पुन्हा कट रचण्यात आला. त्यात मुख्य सूत्रधार बाळ बोठे सह इतर आरोपींबरोबर टम्या पवार सहभागी होता हे सिद्ध होते.

कट यशस्वी झाला असता तर ३० नोव्हेंबर रोजी …. २४ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेला कट यशस्वी झाला असता तर ३० नोव्हेंबर रोजी रेखा जरे यांची हत्या करण्याची वेळ आरोपींवर आली नसती.ही बाब सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

टम्या पवारचा जामीन मंजूर करू नये ! पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात,३० नोव्हेंबर रोजी झालेल्या रेखा जरे हत्याप्रकरणात आरोपी टम्या पवारचा सहभाग स्पष्ट होत असल्याने

टम्या पवारचा जामीन मंजूर करू नये अशी मागणी सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील व फिर्यादीचे वकील सचिन पटेकर यांनी न्यायालयात केली.

टम्या पवारचा या हत्याकांडाशी काहीही संबंध नाही… आरोपींच्या वतीने बाजू मांडताना त्याच्या वकिलांनी आरोपी टम्या पवाराचे इतर आरोपींबरोबर २४ नोव्हेंबर रोजी मोबाईलवर बोलणे झाले.

आरोपींबरोबर एकदाही बोलणे झालेले नाही त्यानंतर रेखा जरे यांची हत्या झाली त्या दिवसापर्यंत (३० नोव्हेंबर) इतर आरोपींबरोबर टम्या पवारचे इतर आरोपींबरोबर एकदाही बोलणे झालेले नाही.आरोपी टम्या पवारचा या हत्याकांडाशी काहीही संबंध नाही.

टम्या पवारचा जामीन अर्ज फेटाळला ! खोटी हकीकत रचून टम्या पवारला हत्याकांडात गोवण्यात आल्याचा युक्तिवाद आरोपी टम्या पवारच्या वकिलांनी न्यायालयात केला.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी आरोपी टम्या पवारचा जामीन अर्ज फेटाळला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe