मुंबई – भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार राज्यात आलं आहे. शनिवारी (23 नोव्हेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
दरम्यान राष्ट्रपती राजवट हटवण्याच्या घडामोडी रातोरात घडल्या. राज्यपालांना फडणवीस सत्ता स्थापन करु शकतात असा विश्वास बसला.
त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवण्याची मागणी केली. रात्रीत चक्रं फिरली आणि भल्या पहाटे म्हणजे 5 वाजून 47 मिनिटांनी महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली.
The notification revoking President's rule in Maharashtra pic.twitter.com/JSbAIOFUE6
— ANI (@ANI) November 23, 2019
खुद्द शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांची काल रात्रीच बैठक झाली. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं. मात्र महाराष्ट्राला गोंधळात टाकणारी सकाळ उजाडली आणि राजकीय भूकंप पाहायला मिळाला.