अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विनयभंग व पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१६ वर्षीय अल्पवयीन मुलीला ज्ञानेश्वर संतोष मोरे याने विनयभंग केल्याने अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केला असता तिची आजी त्याठिकाणी आली.
तेव्हा ज्ञानेश्वर मोरे व अक्षय अक्षय मते या दोघांनी मिळून अल्पवयीन मुलीला व तिच्या आजीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, शिवीगाळ करून,जिवे मारण्याची धमकी दिली.
पीडित मुलीच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगासह, पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.