अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- पुणे येथील नातेवाईकाच्या लग्नाहुन मुंबईकडे परत जाणाऱ्या कारला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी गावच्या हद्दीत मुंबई लेनवर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने धडक दिली. या कंटेनरने ट्रकसह तीन वाहनांना धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला.
या अपघातात आय टेन या कारमधील एकाच कुटुंबातील आई-वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर कंटेनर चालक जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कंटेनरने धडक दिल्यानंतर कार पूर्ण जळून खाक झाली. जोक्विन चेटियार(३६), लुईझा चेटियार (३५) आणि डॅरील चेटियार (४) रा.नायगाव, मुंबई यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या लुईझा यांचे वडील जॉन रॉड्रिग्ज यांची गाडीही त्यांच्या मागेच होती.
आपली मुलगी जावई आणि नातवाचा आपल्या डोळ्यादेखत मृत्यू झाला. मात्र ते काहीही करू शकले नाहीत. आपल्या मुलाचे काल पुण्याला लग्न होते.
लग्नाचा कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याहून निघालो होतो. कंटेनरने जोरामध्ये आपल्या गाडीलाही कट मारला आणि थोड्याच वेळात समोर आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या गाडीला धडक दिल्याचे जॉन रॉड्रिक्स यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम