अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-ब्रिटिश सरकारच्या काळात दलित समाजाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी प्रत्येक गावात या समाजाला जमिनी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत.
परंतु या जमिनीवर आता काही बिल्डरांचा डोळा असून, त्या जागा, जमिनी बळकावण्याचा प्रयत्न काही बिल्डरांकडून होत आहे. मात्र यातील इंचभरही जमीन बिल्डरच्या ताब्यात जाऊ देणार नाही.
असा दिलासा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी दिला. पाथर्डी तालुक्यातील मिरी ग्रामस्थांना सन १८७४ साली ६७ एकर जमीन ब्रिटीश सरकारने येथील महार समाजबांधवांना दिलेली आहे.
मिरी गावालगत असलेली कोट्यवधी रुपयांची ही प्रॉपर्टी नगर येथील काही बिल्डर प्रशासनाला हाताशी धरून हडप करण्याच्या प्रयत्नात आहेत. या जमिनीत पैशाच्या मोहापायी बिल्डरांच्या घशात जाऊ नये म्हणून
येथील तरुणांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन याबाबत यांच्या कानी घातले. यावेळी यावेळी ॲड.आंबेडकर म्हणाले कोणाची हिंमत नाही तुमच्या जमिनीवर पाय ठेवण्याची, मी तुमच्या सोबत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम