नगरकरांनो घरातच बसा…कारण दोन दिवस आहे विकेंड लॉकडाऊन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने कहर केला आहे. नुकतेच दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ कमी झाल्याचे दिसताच जिल्हा अनलॉक करण्यात आला होता. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच निर्बंध लावण्यात आले आहे.

यामध्ये शनिवार व रविवार जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नव्या निर्बंधाप्रमाणे जिल्ह्यात शनिवार व रविवारी जिल्ह्यात पूर्ण बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापना बंद राहणार राहणार आहेत. फक्त हॉटेल, रेस्टारंट यांची पार्सल सेवा सुरू राहणार असून, बस प्रवास, खासगी प्रवास करता येणार आहे.

मात्र संचार करण्यास कोणतीही मनाई राहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या नव्या निर्बंधामुळे शनिवारी व रविवारी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

त्यानुसार शनिवारी व रविवारी जिल्ह्यात पूर्ण बंद राहणार आहे. हॉटेल, रेस्टारंट यांना मात्र फक्त पार्सल सेवा आणि घरपोच सेवा देण्यास परवानगी राहणार आहे. सामाजिक, सांस्कृतिक व करमणुकीच्या कार्यक्रमांना परवानगी राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe