म्हणून नगर जिल्ह्यातील ‘त्या’ वारकऱ्यांना पोलिसांनी घातले ताब्यात!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे आज मितीला राज्यात अनेक निर्बंध घालण्यात आली आहेत.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरे बंद असून आषाढी वारीवर देखील बंधने आणली आहेत.त्यानुसार पायी वारीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र तरीदेखील आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या पाथर्डी तालुक्यातील सुमारे २२ वारकऱ्यांना दिवे घाटाजवळील लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घातले.

आळंदी ते पंढरपुर पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हे वारकरी ‘माझी वारी माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.

मात्र हा पायी दिंडी सोहळा दिवेघाटात पोहोचल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी या वारकऱ्यांना ताब्यात घातले.

यावेळी या वारकऱ्यांनी ‘आम्हाला पंढरपूरला पायी जाऊ द्या’ अशी विनंती केली परंतु पोलीस अधिकारी भूमिकेवर ठाम राहत त्यांना एसटी बसने पंढरपूरकडे रवाना केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe