विनाकारण फिरणाऱ्या रिकामटेकड्यांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- कोरोनाचा वाढता पादुर्भाव पाहता पुन्हा एकदा जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. दरम्यान या विकेंड लॉकडाऊन मध्ये नगर शहरात रविवारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तोफखाना पोलिसांनी कारवाई केली.

रविवारी तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिलीगेट परिसरामध्ये तर कोतवाली हद्दीमध्ये टिळक रोड परिसरामध्ये पोलिसांनी धडक कारवाई मोहीम हाती घेत घराबाहेर फिरणार्‍यांवर कारवाई केली.

तोफखाना पोलिसांनी दिल्ली गेट परिसरात नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली. यावेळी मास्क न घालणाऱ्या एकासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३९ जणांविरोधात कारवाई करत ८ हजार ३०० रुपयांचा दंड केला.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने असे निर्बंध लागू केले आहेत. शनिवार व रविवार संपूर्ण दिवस लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद असताना देखील सुद्धा नागरिक विनाकारण बाहेर फिरतांना आढळून येत आहे.

अनेकजण मास्क वापर सुद्धा वापरत नसल्याचे समोर आल्यावर नगर शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी धडक कारवाईमुळे हाती घेतलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe