जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सहाही आमदार शरद पवार यांच्या मागे !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- आज सकाळी अचानक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे.

या निर्णयाची मतदारांना जशी कल्पना नव्हती तशी राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना देखील कल्पना नसल्याचे समजते. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत.

यापैकी सर्व आमदार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत असल्याचे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी सांगितले.जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सगळे म्हणजेच सहाही आमदार शरद पवार यांच्या मागे असल्याचा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला आहे.

जिल्ह्यातील पक्षाचे आमदार हे सायंकाळी होत असलेल्या बैठकीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. या आमदारांनी मुंबईतील बैंठकीनंतर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

अजित पवार यांचे फॅन म्हणून ओळखले जाणारे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेकडे नगर शहराचे लक्ष लागले आहेत. अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले ‘मी तातडीने मुंबईकडे निघाले असल्याचे सांगितले.

कोपरगावचे आशुतोष काळे आणि राहुरीचे प्राजक्त तनपुरे यांनी पक्षाची मिटिंग दुपारी ४.३० ला होणार असून त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे मुंबईत आहेत.

पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी नेमके काय झाले हे मला अधिकृत पक्षाकडून सांगण्यात आलेले नाही. मला माध्यमातून माहिती मिळाली असून मी मुंबईकडे निघालो आहे. असे सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment