अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- कोरोनाची तिसरी लाट देशात लवकरच येणार असल्याची चिंताजनक बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतात कोरोनाची तिसरी लाट पुढील महिन्यात येऊ शकते. याचबरोबर, या रिपोर्टमध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत ही लाट शिगेला पोहोचण्याचा दावा करण्यात आला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 7 मे रोजी भारतातील कोरोनाची दुसरी लाट शिगेला पोहोचली होती. “सध्याच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टच्या दुसर्या पंधरवड्यापर्यंत कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात.”
जागतिक आकडेवारीवरून समजते की, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत जास्त लोकांना संसर्ग होईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, या लाटेचा परिणाम जवळपास 98 दिवस राहू शकतो.
या व्यतिरिक्त तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, तिसरी लाट दुसऱ्या लाटे इतकीच गंभीर असू शकते. मात्र, सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या कोरोना लसीकरण मोहिमेचाही लोकांना फायदा होईल. या लाटेत मृतांचा आकडा दुसर्या लाटपेक्षा कमी असू शकतो.
याचबरोबर, रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, विकसित देशांमध्ये दुसऱ्या लाटेचा कालावधी 108 दिवस आणि तिसर्या लाटेचा कालावधी 98 दिवसांचा आहे. यादरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी जर चांगली तयारी केली गेली तर मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकतो.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम