अन् त्या महामार्गावर सर्वत्र डाळिंबाचा खच झाला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- जवळपास सर्वच महामार्गावरून प्रवास करताना कमी वेळेत जास्त अंतर कापता यावे यासाठी रस्ते मोठे व कमीत कमी गर्दी राहील याची काळजी घेतली जाते.

मात्र काल पुुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात ऐन सकाळच्यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. कारण रस्त्यावर डाळिंबाचा टेम्पो उलटल्याने रस्त्यावर सर्वत्र डाळिंब पडलेले होते. व ते गोळा करण्यासाठी अनेकजण येत होते.

याबाबत सविस्तर असे की,घारगावमधून मनमाडकडे डाळिंब घेऊन जात असलेला टेम्पो सकाळी पुणे- नाशिक महामार्गावर तालुक्यातील चंदनापुरी घाटातील एका वळणावर टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला अन् सदरचा टेम्पो थेट रस्त्यावरच आडवा झाला.

टेम्पो पलटी झाल्याने आत असलेले सर्व डाळिंब रस्त्यावर विखुरले. ही बातमी परिसरात समजाताच अनेकांनी तिकडे धाव घेतली.

त्यामुळे  या रोडवर नागरिकांची गर्दी झाली. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र याबाबत महामार्ग पोलिसांनीा याबाबत समजताच त्यांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती सुरळीत केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe