अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्या कारणाने जून महिन्यात रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं.
यावेळी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटोदेखील शेअर करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती.
उपचारानंतर पाच दिवसांनी दिलीप कुमार यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.
दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाला 54 पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली आहेत. दिलीप कुमार यांचं खरं नाव मुहम्मद यूसुफ खान आहे.
त्यांनी 1944 मध्ये आलेला चित्रपट ‘ज्वार भट्टा’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी आपलं नाव बदललं.
दिलीप कुमार यांचे भाऊ असलम आणि एहसान खान यांचे गेल्या वर्षी कोरोनाच्या संक्रमणाने निधन झाले. तर सायरा बानो यांनी या संकट काळात अनेक गरजूंना मदत केली होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम