माजी आमदार विजय औटी झाले आक्रमक ! म्हणाले मी सगळयांचा बाप आहे…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  गेल्या सत्तर वर्षांपासून वंचित असलेल्या धोत्रे गावासाठी मी अडीच कोटींचा रस्ता दिला आहे. उद्या येथे कोणी येईल, चार दोन जण सोडून दिले जातील.

‘पाहतोच रस्ता कसा होतो ते ?’ असेही बोलले जाईल. ‘हा रस्ता होणार, अत्यंत चांगला होणार, कोणी खो घालण्याचा प्रयत्न केला

तर मी सगळयांचा बाप आहे’ हे मी सिद्ध करून दाखवेल असे आव्हान देत मा. आ. विजय औटी यांनी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता त्यांच्यावर घणाघाती टीका केली.

राज्य शासनाच्या हमीतून व एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या निधीतून धोत्रे येथे बांधण्यात येणाऱ्या सुमारे अडीच कोटी रूपये खर्चाच्या रस्त्याचे मा. आ. औटी यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.

त्यावेळी ते बोलत होते. औटी म्हणाले, मला असे वाटत नाही की या कामामध्ये कोणी खो घालेल. विकासासाठी तुम्ही निवडून आलेला असाल

तर या गावामध्ये नको, त्या गावामध्ये रस्ता करा, या गावात मते कमी पडली त्यामुळे तेथे कामे नको ही भुमिका योग्य नाही.

चांगल्या कामात कोणी खो घालते का ? नाही घालणार ! घातला तर आपण काय अर्थ काढायचा ? वरातीत नाचायला हे निवडूण आलंय का ? मी तुम्हाला इशारा देतो ‘तुम्हाला परिपक्वता यायला आजून वेळ आहे.

माझे वय ६५ वर्षांचे आहे. १५ वर्षे विधानसभेत मी महाराष्ट्राचे राजकारण पाहिलेलं आहे. विधानसभेत मी मतदारसंघाची वेगळी ओळख निर्माण केलेली होती. तालुक्याची एक उंची होती. तालुक्याकडे पाहण्याचा एक दृष्टीकोण होता’.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe