आधी जावयाला अटक आता नाथाभाऊंनाही ईडीची नोटीस

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरींच्या अटकेनंतर नाथाभाऊंनाही सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावला आहे.

खडसे यांना उद्या सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. या अगोदर जानेवारी महिन्यात या प्रकरणात ईडीने खडसेंची चौकशी केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली.

त्यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्यानंतर आता एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावरही ईडीच्या अटकेची टांगती तलवार आहे.

ईडीकडून खडसे यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे मत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान खडसे यांना सक्तवसूली संचलनालयानं (ED) समन्स बजावलं आहे.

तसंच त्यांना गुरूवारी सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांना युतीच्या सरकार काळात महसूल मंत्री पदही गमवावे लागले होते. यानंतर खडसेंना देखील ईडीने चौकशीला बोलावले होते. या चौकशीला खडसे सामोरे गेले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe