अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- निंबळक बायपास रस्त्यावर दुकानाच्या समोर व पाठीमागे मोकळ्या जागेत एमायडीसी मधील वेस्टेज विषारी कचरा हा साचवून ठेवून मोठ्या प्रमाणात ढीग करण्यात आले आहेत.
त्यामुळे येथून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. काही एमायडीसीत असलेल्या विविध कंपन्यांमधील विषारी व वेस्टेज कचरा निंबळक बायपास जवळील मोकळ्या जागेत परप्रांतीयांनी पत्र्याचे शेडचे दुकाने टाकली आहेत.
विविध कंपन्यांमधील कचरा परप्रांतीय गोळा करून निंबळक बायपास रोडच्या कडेला मोकळ्या जागेमध्ये आणून टाकतात व ते कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावत नाही,
त्यामुळे निंबळक गावातील नागरिकांना व तिथल्या पशु प्राण्यांना ह्या कचऱ्यापासून धोका निर्माण बनला आहे व नागरिकांना येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने हे कचरा भंगाराची दुकाने बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
येथील कचरा, प्लास्टिक, कागद संपूर्ण रस्त्यावर पसरतात त्यामुळे रस्त्यावर संपूर्ण घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे व पावसाळ्यामध्ये या कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात जाळण्यात येते तर या विषारी कचऱ्यामुळे पावसाळ्यात कचऱ्याची राख तळ्यामध्ये जाते
त्या ठिकाणी निंबळक गावांमध्ये पशुपालन फार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे प्राण्यांना देखील मोठा धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करत ही कचऱ्याचची दुकान बंद न केल्यास अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम