अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- श्रीगोंदा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.श्रीगोंदा नगरपालिकेत भाजपचे बहुमत आहे.
मात्र जनतेमधून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीच्या शुभांगी पोटे नगराध्यक्षा आहेत. पालिकेत माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते गटाकडे बहुमत असल्यानं उपनगराध्यक्ष पद पाचपुते गटाकडे आहे.
पाचपुते गटाच्या नगरसेवकांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळावी यासाठी पाहिले एक वर्षाच्या कालावधीत अशोक खेंडके यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. यानंतर एक वर्ष रमेश लाढाणे यांनी उपनगराध्यक्ष पदावर संधी मिळाली होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम