दोन गटात तुफान हाणामाऱ्या, १७ जणांवर गुन्हे दाखल !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- राहुरी तालूक्यातील बारागांव नांदूर येथे दिनांक ६ जुलै रोजी दोन गटात झालेल्या हाणामारीत तलवार, गज व कुऱ्हाडीचा वापर करण्यात आलाय.

या घटनेत दोन्ही गटातील काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर राहुरी पोलिसात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले. सुभद्रा रमेश माळी राहणार म्हैसगाव तालुका राहुरी. यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे

की, दिनांक ६ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजे दरम्यान यातील आरोपींनी फिर्यादी सुभद्रा माळी यांच्या शेतात अनाधिकृतपणे प्रवेश केला. आणि गज व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा मुलगा आकाश व पुतण्या सुनील रोहिदास माळी यांना गंभीर जखमी केले.

तसेच जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. सुभद्रा रमेश माळी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी

  • 1) सावळेराम उर्फ अण्णा रानबा गुलदगड
  • 2) सतीश सावळेराम गुलदगड
  • 3) नवनाथ सावळेराम गुलदगड
  • 4) देवराम राणबा गुलदगड
  • 5) मीना सावळेराम गुलदगड
  • 6) संगीता शिंदे
  • 7) अक्षय शिंदे सर्व राहणार म्हैसगांव, तालुका राहुरी.

यांच्या विरोधात जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केलाय. या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके हे करीत आहेत.

नवनाथ सावळेराम गुलदगड राहणार म्हैसगांव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक ६ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान यातील आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना तलवार, कुऱ्हाड, गज व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.

आणि जिवे मारण्याची धमकी दिली. नवनाथ सावळेराम गुलदगड यांच्या फिर्यादीवरून आरोपी

  • 1) रमेश हरी माळी
  • 2) रोहिदास हरी माळी
  • 3) संतोष रमेश माळी
  • 4) अंकुश रमेश माळी
  • 5) पप्पू रोहिदास माळी
  • 6) मुकेश रोहिदास माळी सुमित्रा
  • 7) सुभद्रा रमेश माळी
  • 8) मनीषा सुनील माळी
  • 9) अंकुश बर्डे सर्व राहणार म्हैसगाव
  • 10) उत्तम बर्डे राहणार दरडगाव थडी, तालुका राहुरी. यांच्या विरोधात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहेत. राहुरी पोलिसात परस्पर विरोधात दाखल झालेल्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील एकूण १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!