अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील दोन दिवसापासून बेपत्ता असलेली 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह वांबोरी परिसरातील विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
एवढ्या लहान मुलीचा मृतदेह आढळून आल्याने ही आत्महत्या की घातपात याबद्दल परिसरामध्ये दबक्या आवाजात मोठ्या चर्चा सुरू आहेत. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास आपल्या घरापासून बेपत्ता झालेली किरण गणेश पाठक वय 13 वर्ष ही बेपत्ता झाली होती.
दरम्यान परिसरात सगळीकडे शोध घेऊन तपास केला असता कुठे मिळून आली नाही.त्यानंतर रात्री आठच्या दरम्यान वांबोरी दूरक्षेत्र येथे बेपत्ता मुलीचे वडील गणेश (दत्ता) मनोज पाठक यांनी वांबोरी पोलीस दूर क्षेत्रामध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ शोध घेण्यासाठी राहुरी चे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ यांच्यासह पोलीस हवालदार चंद्रकांत बर्हाटे, पोलिस हवालदार दिगंबर चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिंदे ,
आदी घटनास्थळी भेट देऊन बेपत्ता किरणचा शोध सुरू केला असता, गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वांबोरी- विळद रस्त्याच्या कडेला भारत जाधव यांच्या मालकीच्या गट नंबर विहिरीतील पाण्यात तरंगताना आढळून आले.
मयत किरण पाठक हिचा मृतदेह विहिरीतून वर काढून उत्तरीय तपासणीसाठी वांबोरी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे
एवढ्या लहान मुलीने आत्महत्या सारखा टोकाचे पाऊल उचलने ही बाब मनाला न पटणारी अतिशय मन सुन्न करणारी असल्यामुळे हा घातपात की आत्महत्या याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम