अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- ग्रामीण रुग्णालयातील चोरी गेलेल्या लाखो रुपयांच्या साहित्य प्रकरणी मंगळवारी दुपारी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रुग्णालयाच्या इमारतीतील खोलीचा दरवाजा तोडून रुग्णांच्या उपचारासाठी वापर होणाऱ्या वस्तूंची चोरी झाली. या घटनेमुळे राहुरीचे ग्रामीण रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले.
ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक प्रताप साळवे यांनी या घटनेसंदर्भात राहुरी पोलिसात फिर्याद दिल्याने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.
राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीची पडझड झाल्याने दोन वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालय नगर परिषदेच्या अभ्यासिका इमारतीत हलवले.
या इमारतीतील उपचाराच्या मशिनरी व इतर साहित्य इतरत्र हलवण्याची गरज असताना मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत गेली दोन वर्षांपासून धूळखात पडून असलेल्या साहित्ये साहित्य लांबवण्यात आले.
चोरी गेलेल्या साहित्यामध्ये एक्स रे मशिन, ऑपरेशन दे बल, वाशिंग मशिन, सोलर मशिन, काॅट, स्ट्रेचर, खुर्च्या, रेफ्रिजरेटर, व्हील चेअरसह इतर साहित्याचा समावेश आहे. ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक साळवे
यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धाकराव करीत आहेत.
राहुरी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पूर्वीपासूनच दुर्लक्षित राहिला असून शासनाचा पाच आकडी पगार घेणाऱ्यांची कार्यपद्धत कायमच वादग्रस्त ठरली.
राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व सुविधायुक्त नवीन इमारतीसाठी निधी मंजूर असताना देखील राजकीय कुरघोडीमुळे ही इमारत होऊ शकली नाही.
अखेर इमारतीसाठी मंजूर असलेला कोट्यवधी रुपयांचा निधी माघारी गेला. नगर-मनमाड राज्य महामार्गा लगतचे शहर म्हणून
राहुरीचा संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असली तरी विविध घटनांत जखमी झालेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळू न शकल्याने जीव गमवण्याची वेळ अनेकदा आली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राबद्दल नेहमी रोष व्यक्त केला जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम