अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- चुलत बहिणीच्या खूनप्रकरणी न्यायालयाने भावाला दोषी धरून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
मारूती अर्जुन ठोकळ (रा. कामरगाव ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. मारूती ठोकळ याची त्याची चुलत बहीण रूपाली हिच्यावर वाईट नजर होती. रूपालीचा विवाह होऊ नये, म्हणून मारूती तिला फोन करून त्रास देत असे.
24 मार्च 2016 रोजी रूपाली घरी एकटी असताना मारूती तिच्या घरी गेला व म्हणाला तुला केलेले फोन तु तुझ्या वडिलांना का सांगते, असे म्हणत मारूतीने रूपाली बरोबर वाद घालून झटापट केली. मारूतीने रूपालीच्या अंगावर रॉकेल ओतले पेटून दिले.
पेटलेल्या रूपालीने आरडाओरडा करताच मारूतीने रूपालीच्या अंगावर गोधडी टाकून तिला विझवले. स्टोव्हवर वांगे भाजत असताना स्टोव्हचा भडका होऊन भाजली आहे, असे सर्वांना सांग नाहीतर तुझ्या घरच्यांचे वाटोळे करीन, असा दम मारूतीने रूपालीला दिला.
यानंतर मारूतीने रूपालीला सुरूवातीला सुपा येथे व नंतर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी नगर तालुका पोलीस व नायब तहसीलदार यांनी रूपालीचे स्वतंत्र जबाब नोंदविले.
रूपालीच्या आई-वडीलांनी तिला दुसर्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे रूपालीवर उपचार सुरू असताना पोलिसांनी तिचा तिसर्यांदा जबाब नोंदविला. तसेच नगर येथील पुरवठा अधिकारी यांनी चौथ्यांदा रूपालीचा जबाब नोंदविला.
तिसर्या व चौथ्या जबाबात एकवाक्यता होती. यानंतर रूपालीचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी रूपालीने दिलेल्या जबाबावरून मारूती ठोकळ विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात एकुण आठ साक्षीदार तपासले गेले.
सरकारी पक्षाच्या वतीने वकील केदार केसकर यांनी काम पाहिले. त्यांना सरकारी वकील सतीश पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर सहायक फौजदार सोनवणे व पोलीस हवालदार पी. पी. रोकडे यांनी मदत केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम