अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- करंजी ता पाथर्डी येथील शासकीय आरोग्य उपकेंद्रात आत्महत्या करणाऱ्या डॉक्टर गणेश शेळके यांच्या नोट प्रमाणे वरील अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची
मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले
यावेळी जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दीपक गुगळे, सचिव अमित गांधी, शहराध्यक्ष शाहनवाज, तालुका अध्यक्ष सुशील साळवे, अमोल गायकवाड आदि उपस्थित होते.
डॉ.गणेश गोवर्धन शेळके हे शासकीय आरोग्य उपकेंद्र करंजी तालुका पाथर्डी येथे मागील अनेक दिवसांपासून कार्यरत होते त्यांनी या संपूर्ण जीवघेण्या कोरोणाच्या काळात देखील आपली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली
तरीही सतत होणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली त्यांच्याजवळ सापडलेल्या सुसाईड नोट प्रमाणे वैद्यकीय अधिकारी भगवान दराडे तहसीलदार आणि कलेक्टर या सर्व संबंधित
अधिकाऱ्यांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना तात्काळ निलंबित करून अटक करण्यात यावे अन्यथा जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस अधिक्षक कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम