माजी आमदार जगताप म्हणाले मी केवळ घोषणा करून थापा मारत नाही..

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :-  श्रीगोंदे तालुक्यातील निंबवी ते पांडवगिरी, रस्ता या कामाचे भूमिपूजन जिल्हा बँकेचे संचालक, माजी आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.

मी केवळ घोषणा करून थापा मारत नाही, प्रत्यक्षात निधी आणून काम करतो, असे सांगून आमदार बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता टीका केली. श्रीगोंदे तालुक्यातील निंबवी ते पांडवगिरी या रस्त्याचे भूमीपूजन प्रसंगी ते बाेलत हाेते.

माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, मी विधानसभा सदस्य असताना या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला. विकास कामांच्या केवळ घोषणा करून नंतर त्यावर थापा मारण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर आपण भर देत आहोत.

निंबवी ते पांडवगिरे रस्त्यांसाठी १०९.३० लाखांचा निधी राहुल जगताप यांनी मंजूर करून आणला. रस्ता हा सर्वसामान्य जनतेच्या निकडीचा व विकासाचा महत्वाचा भाग आहे. मतदारसंघातील सर्व गावांना पक्क्या रस्त्याने जोडण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे.

याच धरतीवर तालुक्यातील विकास कामासाठी सतत पाठपुरावा करून निधी उपलब्ध करण्यावर माझा भर राहिल. गावाच्या विकासासाठी राजकारण न करता सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. याप्रसंगी विजय शिर्के, सुभाष शिर्के, तात्यासाहेब शिर्के, संभाजी शिर्के, बाळासाहेब गावडे,

सरपंच अप्पासाहेब शिर्के, उपसरपंच सुप्रिया गावडे, काकासाहेब शिर्के, सुरेखा गावडे, गीताबाई बिडेकर, शुभांगी धानगुडे, गावडे गुरूजी, हरिश्चंद्र शिर्के, किसन शिर्के, पोपटराव शिर्के, धानगुडे, संतोष गावडे, बंडुपाटील कातोरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News