अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे मुळा रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2021.22 च्या डी फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता प्रवेश सुविधा केंद्राला तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांची मान्यता मिळाली आहे
यामुळे सोनई परिसरातील ग्रामीण भागातील डी फार्मसी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची व पालकांची धावपळ कमी होऊन सोनई मध्ये ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती मुळा एज्युकेशन संस्थेचे सहसचिव डॉ व्ही.के. देशमुख यांनी दिली.
महाविद्यालयाच्या या सुविधा केंद्रात अद्यावत संगणक कक्षात विद्यार्थ्यांना इंटरनेट सुविधा व प्रवेश प्रक्रिये संदर्भाची प्रक्रिया राबविण्यात येईल.
केंद्रीभूत प्रवेश निश्चितीसाठी ऑनलाइन फॉर्म भरून कागदपत्रांची तपासणी करणे, छाननी करणे, ऑप्शन फॉर्म भरणे ही कामे या सुविधा केंद्रामार्फत मोफत करण्यात येतील, या सुविधा केंद्राचा संकेतांक 5277 असून
प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांनी तयार ठेवावेत असे आवाहन महाविद्यालया मार्फत करण्यात येत आहे तसेच व्यवस्थापन कोटा किंवा शासकीय कोट्यातून प्रवेशासाठी ऑनलाइन फॉर्म भरून प्रवेश प्रक्रियेच्या मिरीट लिस्ट मध्ये नाव येणे गरजेचे आहे,
तो मेरिट नंबर प्रवेशासाठी आवश्यक आहे.सोनई मध्ये डी फार्मसी अभ्यासक्रमाची दोन् महाविद्यालये असून त्यांची एकूण प्रवेश क्षमता 120 जागांची आहे, गेल्या 18 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत महाविद्यालय वाटचाल करत आहे
निसर्गरम्य वातावरणात महाविद्यालयाची भव्य सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, ग्रंथालय, इंटरनेट वायफाय सुविधा, मुला मुलींचे स्वतंत्र वस्तीगृह, जिमखाना,प्लेसमेंट सुविधा व तज्ञ अनुभवी शिक्षक वृंद आदी सुविधा उपलब्ध आहे.
याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इंडस्ट्रियल व्हिजिट, तज्ञांचे मार्गदर्शन शिबिर, माजी विद्यार्थी मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन केले जाते तरी डी फार्मसी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या
विद्यार्थ्यांनी दि.10 जुलै 2021 पासून तंत्र शिक्षण संचालनालय यांच्या अधिकृत संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी मुळा रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सोनई येथे संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाचे डॉ. व्ही.बी. घावटे संपर्क 9960205257 व पी.जे घुले संपर्क 8888080180 यांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम