कधी सुरू होणार महाविद्यालयं? उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शिक्षण क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. अनेक विद्यार्थांवर शाळा सोडण्याची वेळ आली आहे.

तर काही शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग स्विकारला आहे. अशात सध्या राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे.

त्यामुळे राज्यात महाविद्यालये पुन्हा कधी सुरू होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. राज्यात महाविद्यालये कधी सुरू होणार

याबाबत महत्त्वाचे संकेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. राज्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होतं असली तरी, धोका अद्याप संपलेला नाही.

त्यामुळे सद्यस्थितीत महाविद्यालये पुन्हा सुरू करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तूर्तास महाविद्यालये किंवा शाळा सुरू करण्याचा सरकारचा मानस अजिबात नाहीये. एका शासकीय बेठकीसाठी अमरावतीत आले, असता त्यांनी ही माहिती दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!