अजित पवारांचे ‘ते’ वक्तव्य व्हायरल

Ahmednagarlive24
Published:
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी बंडखोर आमदारांबद्दल केलेले एक वक्तव्य त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांना राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिले. मात्र तीनही पक्षांकडे सरकार स्थापन करण्याएवढे पुरेसे संख्याबळ नव्हते. त्यामुळे सत्तास्थापनेचा पेच सुटू न शकल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
भाजपाचे राज्यसभेतील खासदार नारायण राणे यांनी एक वक्तव्य केले होते.  राणेंच्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून फुटलेल्या बंडखोरांना इशारा दिला होता. अजित पवार म्हणाले होते की, ‘कुठलाही आमदार आपला पक्ष सोडून जाणार नाही.
कुणी तशी हिंमत केलीच तर सर्व पक्ष त्याच्यासमोर एकच उमेदवार देतील आणि त्याला पाडतील. सर्वपक्षीय उमेदवाराच्या विरोधात कुठलाही ‘माई का लाल’ पुन्हा आमदार म्हणून निवडून येणार नाही,’ असे अजित पवार म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment