धक्कादायक ! अन त्याने पत्नीवरच चाकूने सपासप वार केले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  अनैतिक संबंधाच्या रागातून पतीनेच त्याच्या पत्नीवर चाकूने सपासप वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंजली नितीन निकम असे त्या हत्त्या झालेल्या महिलेचे नाव असून याप्रकरणी पोलिसानी नितीन बापू निकम याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार पुण्यातील हडपसर या ठिकाणी घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मृत महिला अंजली व नितीन हे दोघे पती पत्नी असून ते भोसरीतील चक्रहास वसाहतीत राहत होते. आरोपी पती नितीन हा मागच्या काही दिवसांपासून पत्नी अंजलीवर चारित्र्यावरून संशय घेत होता.

यामुळे त्यांच्यात अनेकदा वादसुद्धा झाले होते. या भांडणाला कंटाळून मृत अंजली हडपसर गाडीतळ येथील तिच्या बहिणीकडे आली होती. पत्नी बहिणीकडे गेल्याचा राग मनात धरून पती नितीनने पत्नी अंजलीला संपवण्याचा कट रचला.

त्यानुसार शनिवारी दुपारच्या सुमारास आरोपी नितीन पत्नीला घेण्यासाठी मेव्हुणीच्या घरी गेला. तिकडून पत्नी अंजलीला घेऊन तो, आपल्या मुलाला घेण्यासाठी सासूच्या घराकडे निघाला.

त्याने गाडीतळ बंटर शाळेच्या आवारात निर्जन ठिकाणी गाडी थांबवली आणि पत्नी अंजलीवर चाकूने सपासप वार करत तिची हत्या केली. या हल्ल्यात अंजली जखमी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe