अरेअरे ! अज्ञात वाहनाच्या धडकेने ‘त्याने’ गमावले प्राण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- अज्ञात वाहनाने धडक दिल्याने आठ महिने वयाचा बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे नाशिक-पुणे महामार्गावरील तालुक्यातील चंदनापुरी जवळील जावळे वस्ती परिसरात घडली.

शनिवारी पहाटे नाशिक – पुणे महामार्गावर आठ महिने वयाचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती समजताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृत बिबट्याला चंनापुरीच्या निसर्ग परिचय केंद्रात आणले.

भक्ष्याच्या शोधात बिबट्यांचा मानवी वस्तीकडे वावर वाढल्याने दिवसागणिक बिबट्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढल आहे, पुणे नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटात वनविभागाचे मोठं क्षेत्र आहे त्यामुळे अनेक वेळा बिबट्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

संगमनेर शहरा लगत मोठ्या प्रमाणावर ऊस, मका यांचे उत्पादन घेतले जाते. बिबटे अन्नाच्या शोधात या ठिकाणी रात्री येत असतात. शहरातील पंचायत समिती कार्यालयाच्या मागील शेत जमिनी मध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. काल रात्री या बिबट्याने एका वासराला फस्त केले होते .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe