विधानसभा अध्यक्षपदाबाबत शरद पवार म्हणाले…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- शिवसेनेकडे विधानसभेचं अध्यक्षपद हवं आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंनी मंत्रिपदाचा देखील बळी देऊ नये, अशी चतूर भूमिका भास्कर जाधवांनी मांडली होती.

तसंच मी विधानसभेचं अध्यक्ष व्हावं अशी चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे, असा दावा भास्कर जाधवांनी केला होता. यानंतर अनेक तर्क वितर्क लावले जात होते. दरम्यान आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाष्य केलं आहे.

आमचा तीन पक्षांचा निर्णय स्वच्छ झालाय, विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबध नाही. तिन्ही पक्षांनाही काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत, असं शरद पवार यांनी सांगितलं.

महाविकासआघाडीतील पक्षांनी स्वबळाची भाषा करण्यात काहीही गैर नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. प्रत्येकजण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करणार की नाही? त्यामुळे ते आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्नात असणार.

आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe